|
फिरत्या फेरीवाल्याचा परवाना |
| |
| |
| Application No. / अर्ज क्रमांक :
Label
|
| License Holder's Name / परवाना धरकाचे नाव : Label
|
| Address / पत्ता :
Label
|
| Date / दिनांक : Label
|
| Nature of business / धंद्याचे स्वरूप :
Label
|
| |
| |
| नियम आणि अटी |
| |
| 1.फेरीच्या धंद्याचे परवाने तारीख १ एप्रिल पासून सुरु होणारे तिमाहीसाठी अगर संबंध आर्थिक वर्षासाठी म्हणजे १ एप्रिल ते ३१ मार्च अखेर दिले जातील. सदर तिमाही किंवा वर्ष परवाने दिले जातील त्या तारखेपासून समजण्याचे नसून ती मुदत १ एप्रिल पासुन सुरु होणारे वर्ष किंवा त्याची तिमाही अशी समजावयाची आहे. |
| 2.फेरीचा धंदा करू इच्छिणाऱ्याने धंदा सुरु करण्याचे तारखेआधी निदान दहा दिवस अगोदर त्यासाठी परवाना मिळावा म्हणून कामगार कल्याण व जनता संपर्क अधिकारी यांचे कार्यालयाकडे आवश्यक तो परवाना फी भरून व स्वतःच्या फोटोच्यादोन प्रतिसह अर्ज केला पाहिजे व अर्जानुसार परवाना मंजूर झाला असल्यास, दहाव्या दिवशी समक्ष येऊन सदर परवाना वरील कार्यालयामधून नेला पाहिजे. |
| 3.जुन्या परवान्याची मुदतवाढ होणेसाठीचे अर्ज जरूर त्या फी निशी त्या परवान्याची मुदत संपण्याआधी निदान ७ दिवस अगोदर करून मंजूर मुदतवाढ, मुदतीपूर्वी, स्वतःचे परवान्यात वरील कार्यालयामधून नोंदवून नेली पाहिजे. |
| 4.फी भरली अथवा स्वीकारली म्हणून त्या आधारे अर्जदारास, परवान्या बाबत कोणताही हक्क वगैरे प्राप्त होत नाही. |
| 5.परवाना धारकाने हा परवाना, धंद्याच्या ठिकाणी, सदैव आपल्या जवळ ठेवला पाहिजे व कोणत्याही महापालिका अगर पोलीस अधिकाऱ्याने मागितला असता तो ताबडतोब दाखविला पाहिजे. |
| 6.शहरातील खालील रस्ते, चौक व भाग फेरीने धंदा करण्यास बंद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार परवाना धारकाने सदर ठिकाणी धंदा करता कामा नये अथवा माल घेऊन धंद्याचे निमित्ताने फिरताही कामा नये. |
| अ)महापालिका अगर खाजगी मंडईच्या आसपासची शंभर मीटर्सची कक्षा. |
| ब)शाळा, कॉलेज, सरकारी व निमसरकारी कार्यालये, देवळे, मशिदी, प्रार्थना गृहे, सरकारी अगर खाजगी दवाखाने, बँक्स यांच्या आसपास ५० मीटर्सची कक्षा. |
| क)मंगळवार पेठेतील मधला मारुती देवालयाचे आसपासची २०० मीटर्सची कक्षा. |
| ड)हाजीमाई (जुना दत्त) चौक ते चिवडेवाला मारुती ते मेक्यानिक चौक संपूर्ण रस्ता सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ५ ते १० पर्यंत. |
| ई)रेल्वे स्टेशन चौकातीलमहात्मा गांधी पुतळ्याच्या आसपासची १५० मीटर्सची कक्षा. |
| फ)मेकॅनिक, पांजरपोळ, कुंभार वेस, माणिक चौकाचे व विजापूर वेस आसपासची ५० मीटर्सची कक्षा. |
| ग)मंगळवार व बुधवार आठवडे बाजारातील राखीव भागा व्यतिरिक्तचा भाग. |
| ह)मा. आयुक्त महानगरपालिका सोलापूर व मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी वेळोवेळी फेरीवाल्यास बंद केलेले रस्ते व भाग. |
| 7.परवाना धारकाने माल विक्री करण्याकरिता नेहमी फिरते राहिले पाहिजे.रहदारीस अडथळा होईल अगर उपसर्ग पोहचेल अशा रीतीने किंवा माल विक्री माल विक्री करण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त थांबता कामा नये. |
| 8.परवाना धारकाने परवान्यामध्ये निदिष्ट केलेल्या जिनसा व्यतिरिक्त दुसरे जिन्नस विकता कामा नये. |
| 9.परवाना धारकाने आपले विक्रीचे जिन्नस विशेषतः खाद्य पदार्थ, पेय,फळे, इ. विकताना पराकष्टेची स्वच्छता राखली पाहिजे. |
| 10.विक्रीचे जे जे पदार्थ माशा जमण्यासारखे असतील, ते ते सर्व प्रतिबंधक जाळ्याचे झाकनाखाली पूर्णतया झाकून ठेवले पाहिजे. |
| 11.मा. आरोग्याधिकारी, मुख्याधिक्ष्क मंडई, आरोग्य व अतिक्रमण निरीक्षक यांच्या मतेआरोग्यास विघातक असलेला परवाना धारका जवळील फळे, भाज्या, पेय व खाद्य पदार्थ नाश करण्याचा त्यांना अधिकार आहे. |
| 12.परवाना धारण करणारा अगर त्याच्या बरोबर असणारा त्याचा कोणताही नौकर जर संसर्गजन्य रोगाने अगर जखमेने पछाडलेला असेल तर त्याचा परवाना परत घेतला जाईल, परंतु दिलेली फी मात्र परत केली जाणार नाही. |
| 13.परवाना धारकाने कोणतेही त्रासदायक अथवा कर्कश आवाज काढू नयेत अगर अशा तऱ्हेचे आवाज निघतील असे वाद्य, घंटा अथवा अन्य यांत्रिकी उपकरण यांचा उपयोग गिऱ्हाईकास आकर्षण करून घेणे करीता करता कामा नये. |
| 14.त्याने दांडगाईची, क्षोभकारक, अश्लील, शिवीगाळीची अगर किळसवाणी अशी भाषा वापरता कामा नये व तसे वर्तनही करता कामा नये. |
| 15.त्याने चालू कायद्याने मंजूर केली नाहीत अशी वजने, मापे व तराजू वापरता कामा नयेत. |
| 16.कोणत्याही परिस्थितीत दिलेला परवाना दुसऱ्याच्या नावे बदलला जाणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा परवाना दुसऱ्यास वापरण्यास देता कामा नये. |
| 17.परवाना धारकाने परवान्यामधील एखाद्या अटीचा भंग केला असेजर मा. आयुक्त, मा. सहा. आयुक्त, मा. आरोग्याधिकारी व मुख्याधीक्षक मंडई वगेरे यांचे निदर्शनास आले तर सदरचा परवाना परत घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अथवा सदर परवान्याचे नूतनीकरण नाकारण्याचा त्यांना अधिकार आहे मात्र असा परवाना परत घेतल्याने अगर रद्द केल्याने अगर त्याचे नूतनीकरण नाकारल्याने परवाना धारण करणाऱ्याच्या विरुद्ध महानगरपालिकेने करावयाच्या इतर कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीस अगर हक्कास त्यामुळे बाध येणार नाही किंवा परवाना धारण करणारास भरलेली फी परत मागण्याचा अगर इतर कसलाही नुकसान भरपाई मागण्याचा हक्क उत्पन्न होणार नाही. |
| 18.फेरीने धंदा करणारा जर बिगर परवाना धंदा करीत असेल तर परवान्याची एखादी अट मोडतील तर त्याचा माल उचलून नेला जाईल व त्याच्यावर खटला केला जाण्यासही तो पात्र होईल. |
| 19.सदर परवाना इतर कायद्यातील तरतुदीनाही पात्र राहील. |
| 20.सदरचा परवाना हरवल्यास अथवा खराब झाल्यास एक रुपाया आकार देऊन डुप्लीकेट परवाना घ्यावा. |
| |
मंडई अधिक्षक,
सोलापूर महानगरपालिका |
| |
| |